• इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

  • Auteur(s): Sutradhar
  • Podcast

इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

Auteur(s): Sutradhar
  • Résumé

  • श्रोतेहो नमस्कार!खास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नल-दमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसह! https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar
    Voir plus Voir moins
Épisodes
  • गणपतीचे हत्तीचे मस्तक
    Feb 8 2023
    गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Voir plus Voir moins
    5 min
  • स्यमंतक मण्याची कहाणी
    Feb 1 2023
    श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे. एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Voir plus Voir moins
    11 min
  • सत्यवतीचा विवाह
    Jan 25 2023
    एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊन शान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली "महाराज! आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केलं आहे आणि धनुर्विदयेची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे. हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे.” असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शान्तनु यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शान्तनुना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Voir plus Voir moins
    10 min

Ce que les auditeurs disent de इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.