• कबूतर आणि शिकारी

  • Nov 3 2022
  • Durée: 8 min
  • Podcast

कबूतर आणि शिकारी

  • Résumé

  • सर्वेषामेव मत्त्याँनां व्यसने समुपस्थिते। वाङ्मात्रेणापि साहाय्यं मित्रादन्यो ना सन्दधे॥ संकटकाळी मदतीचं आश्वासनही केवळ मित्राकडूनच मिळू शकतं, जसं चित्रग्रीवाच्या सांगण्यावरून हिरण्यकाने आपल्या मित्राला मदत केली. एका वनात एका वडाच्या झाडाच्या आधाराने बरेच पशू-पक्षी राहत होते. त्याच झाडावर एक लघुपतनक नावाचा कावळा राहत होता. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात निघाला असताना त्याला एक शिकारी जाळं घेऊन त्याच झाडाजवळ येताना दिसला. तो विचार करू लागला की हा शिकारी तर आपल्या सोबत पक्ष्यांची शिकार करायला आलाय, मी सगळ्यांना आत्ताच सावध करतो. हा विचार करून तो परत आला आणि आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र करून त्यांना सांगू लागला ,'शिकारी त्याचं जाळं टाकून त्यावर तांदळाचे दाणे पसरवेल आणि जो कोणी ते दाणे खायला जाईल तो त्या जाळ्यात अडकेल.म्हणून आपल्यापैकी कोणीही ते दाणे खायला जायचं नाही. काही वेळातच शिकार्‍याने त्याचं जाळं पसरवून त्यावर दाणे पेरले आणि तो एका बाजूला जाऊन लपून बसला. बरोबर त्याच वेळी चित्रग्रीव नावाचं कबुतर आपल्या परिवारासोबत अन्नाच्या शोधात तिथे आलं. चित्रग्रीवाने ते तांदळाचे दाणे पाहिले आणि त्याला त्याचा लोभ झाला. कावळ्याने त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु चित्रग्रीवाने त्याचे काहीच ऐकलं नाही आणि ते दाणे खाण्यासाठी आले आणि त्याच्या परिवारासोबत त्या जाळ्यात अडकले. आपल्या जाळ्यात इतक्या कबुतरांना अडकलेलं पाहून शिकारी खुश झाला आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ लागला. शिकार्‍याला आपल्या जवळ येताना पाहून कबुतरांच्या प्रमुखाने सगळ्यांना संगितलं , 'तुम्ही सगळेजण या जाळ्यासकट थोडं दूर उडायचा प्रयत्न करा तोपर्यंत मी या जाळ्यातून सुटण्याचा उपाय शोधतो. जर असं नाही केलं तर शिकार्‍याच्या हातात पडून आपण सगळे नक्की मारले जाऊ. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de कबूतर आणि शिकारी

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.