मनाचा गूढसोपेपणा उलगडून टाकणारं पुस्तक म्हणजे नोबेल विजेते डॅनियल काह्नमन यांनी लिहीलेले - थिंकींग, फास्ट & स्लो.
आपले मन हा एक गूढ पेटारा आहे… गेल्या हजारो वर्षात मानवाने प्रचंड प्रगती केली, निरनिराळे शोध लावले, अशक्य अशा गोष्टी साध्य केल्या पण अजूनही मनाचा गुंता आपल्याला समजला आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची विचार करण्याची एक स्वतंत्र शैली आहे, पण तरिही सायकोलॉजीच्या अभ्यासकांनी मन समजून घेण्याचे काही पॅटर्न्स शोधून काढलेच आहेत ज्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाचे मन थोड्याफार प्रमाणात समजून घेणे जमू लागले आहे… आपण विचार कसा करतो, निर्णय कसे घेतो, एखाद्या घटनेकडे कोणकोणत्या दृष्टीकोनातून बघतो, आणि या सगळ्याचा आपल्या विचार व भावनांवर कसा परीणाम होतो या वर चर्चा करणार्या या पुस्तकाबद्दल आपण समजून घेणार आहोत आजच्या या पुस्तक कट्ट्यावर.
#PustakKatta #MarathiPodcast #BookSummary #BookDiscussion #ThinkingFastAndSlow #DanielKahneman #CognitiveBias #DecisionMaking #BehavioralScience #CriticalThinking #PsychologyOfThinking #BehavioralEconomics #MentalModels #ThinkBetter #RationalThinking #marathi #podcast #dramitkarkare