या सेगमेंट मधे आपण बेस्टसेलर पुस्तकांचे सार निवडक दहा सूत्रांमध्ये मराठीतून सादर करतो. आजचे पुस्तक आहे मॉर्गन हाऊझल यांनी लिहीलेलं ‘द साइकोलॉजी ऑफ मनी’
हे पुस्तक केवळ पैशांबद्दल नाही - तर ते जीवनाबद्दल आहे. हे पुस्तक आपल्याला पैशांसोबत असलेल्या आपल्या नात्याला समजून घेण्यास मदत करते, जे अनेकदा आपल्या भावनांशी, संस्कारांशी आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाशी जोडलेले असते. आपले आर्थिक निर्णय घेताना नम्रता, संयम, आणि व्यापक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे ते हे पुस्तक आपल्याला शिकवते.
तुम्ही नुकतीच बचत करायला सुरवात केलेली असो किंवा बरेचसे पैसे कमवून आता त्याच्या योग्य विनियोग करण्याच्या विचारात असाल, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच एक योग्य विचार देईल.
#pustakkatta #bestseller #booksummary #vivekikatta #thepsychologyofmoney #psychologyofmoney #morgan #marathi #podcast