Épisodes

  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    Feb 21 2025

    ठळक बातम्या

    ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन, दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात, बदनापूरमध्ये पेपर फुटला नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

    जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

    मुंबई उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या स्थायी नियुक्तीला न्यायवृदांची मंजुरी

    आणि

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत


    Voir plus Voir moins
    10 min
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 21 2025

    ठळक बातम्या

    ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन, दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन

    अमेरिकेत एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती

    भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाचा ‘वुमन ऑफ द इयर’ सन्मान

    आणि

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत


    Voir plus Voir moins
    10 min
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १८ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 18 2025

    ठळक बातम्या

    कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर,/ दोन्ही देशात महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार

    मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या उपान्त्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात ३८३ धावांचा डोंगर

    आणि

    वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहबादीयाला अटकेपासून संरक्षण


    Voir plus Voir moins
    10 min
  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक १७ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    Feb 17 2025

    ठळक बातम्या

    MSME साठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरुवात, बँक गैरव्यवहारात पैसे अडकलेल्यांना वीम्याअंतर्गत अधिक रक्कम देण्याचा प्रस्ताव

    दिल्ली आणि बिहारमधे भूकंपाचे धक्के, सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करण्याचं प्रधानमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

    राज्यात चालू साखर हंगामात सुमारे ६१ लाख टन साखरेचं उत्पादन

    अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेल्या ११२ भारतीयांचं विमान अमृतसरमधे दाखल

    आणि

    इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा प्रोपेलेंट मिक्सर विकसित

    Voir plus Voir moins
    10 min
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १७ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 17 2025

    ठळक बातम्या

    दिल्ली आणि बिहारमधे भूकंपाचे धक्के, सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करण्याचं प्रधानमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

    हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून, या क्षेत्रातील देशांमध्ये संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी करण्याची गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन

    अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेल्या ११२ भारतीयांचं विमान अमृतसरमधे दाखल

    इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा प्रोपेलेंट मिक्सर विकसित

    आणि

    FIH प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर २-० नं विजय


    Voir plus Voir moins
    10 min
  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक १६ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    Feb 16 2025

    ठळक बातम्या

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं भारत टेक्स २०२५ मध्ये सहभागी होणार

    नवी दिल्ली स्थानकावरच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन/ दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी काँग्रेसची मागणी

    भारतीय भांडवली बाजारामधून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१ हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली

    आणि

    नाशिक शहरात बनावट कॉल सेंटर चा छडा



    Voir plus Voir moins
    10 min
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १६ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 16 2025

    ठळक बातम्या

    नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी होऊन किमान १८ जणांचा मृत्यू/ दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं भारत टेक्स २०२५ मध्ये सहभागी होणार

    भारतीय भांडवली बाजारामधून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१ हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली

    आणि

    वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय


    Voir plus Voir moins
    9 min
  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक १५ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    Feb 15 2025

    ठळक बातम्या

    पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नवसंशोधक आणि उद्योजकांना आवाहन

    बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यासंदर्भात राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन

    सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांना सुरुवात

    ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक केसरी पाटील यांचं निधन

    आणि

    महिला प्रीमिअर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना


    Voir plus Voir moins
    10 min